प्रतिनिधी , नांदेड : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांच्या घोळामुळे नांदेड जिल्ह्यातील कोसमेट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळकी खुर्द गावातील मतदारांना मतदान हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच किनवट तालुक्यातील कोसमेट येथे उघडकीस आला असून. यावेळी बोलताना म्हणाले की. कोसमेट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळकी खुर्द येथील मतदारांनाचे यादीमध्ये नावे कमी केल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावे, नावे कमी करून मतदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावला येणार नाही. तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्यात यावे. मतदाना यादीमध्ये नावे समाविष्ट करून निवडणुका घेण्यात यावे.अशी मागणी कोसमेट येथील माजी सरपंच शिवाजी बोटेवाड यांनी केली आहे.
