जनतेज न्युज

31डिसेंबर साजरा करण्याकरिता राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करा, मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त-विश्वास नागरे पाटील, पोलीस सहआयुक्त

प्रतिनिधी , मुंबई : करोनाच्या काळामध्ये मुंबई पोलिसांनी चोख कामगिरी करत दिवस-रात्र मुंबईकरांची सेवा केली आहे या काळामध्ये 98 पोलीस अधिकारी कर्मचारी हे शहीद झाले आहे जोपर्यंत करोना विषाणू चा संपूर्ण नाहीसा होत नाही तोपर्यंत मुंबई पोलिस आपलं कर्तव्य बजावत राहणार लाँकडाऊनच्या काळामध्ये काही ठिकाणी पोलिसांना कटू अनुभव आले त्यामुळे कठोर निर्णय मुंबई पोलिसांना घ्यावे लागले मात्र हे सर्व निर्णय मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आले त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसारच 31 डिसेंबर नागरिकांनी साजरा करावा तसेच मुंबई पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आले तसेच 31डिसेंबर करिता मुंबईत मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती देखील मुंबई सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिली आहे.