जनतेज न्युज

बनियानवर फिरले शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ; विनाअनुदानित शिक्षककांचे प्रतिनिधी

प्रतिनिधी , यवतमाळ : अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली.
यात बनियानवर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार फिरल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. उपेंद्र पाटील यांनी आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात भेट दिली.
21 वर्षांपासून शिक्षक विनाअनुदानित शाळावर काम करत आहेत. त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे. मुले देखील त्यांची गम्मत करतात. शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपेंद्र पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. शासनाचा निषेध म्हणून बनियान वर फिरून मतदारांकडे मत मागितले.