जनतेज न्युज

बर्ड फ्ल्यू च्या भितीने गेवराई तील चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट

प्रतिनिधी , बिड : कोरोना आल्यानंतरच्या काळात चिकन मटन तसेच मांसाहार खाण्याचे बऱ्याच जणांनी टाळले परंतु नंतर सर्व काही सुरळीत चालु झाले त्यातच बंद पडलेले चिकण विक्रेत्यांचे दुकानही व्यवस्थीत चालु झाले त्यांचाही व्यवसाय पुर्व पदावर येतंच होता त्यातचं पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यू ची भिती निर्माण होऊ लागली आणी पुन्हा चिकण मार्केटमध्ये शुकशुकाट पहायला मिळु लागला.
Vo
कोरोना नंतर आता बर्ड फ्ल्यू ची भिती अधिक गडद होऊ लागली आहे काही ठिकाणी कावळे तर काही ठिकाणी कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत मात्र हे पक्षी मृत अवस्थेत जरी आढळून आले असले तरी त्यांचा अहवाल अद्यापपर्यंत हाती आलेला नाहीये तरीही लोकांनी बर्ड फ्ल्यू च्या भितीने चिकन मटनाकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे कोरोना आला तरी आरोप कोंबड्यांवर आणी आता बर्ड फ्ल्यू चे संकट घोंगावते तरिही आरोप कोंबड्यांवरच त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी हे सर्व निष्पन्न करुन कोंबड्यांवर होणाऱ्या आरोपाला ब्रेक लावावे याचा मोठा फटका आमच्या सारख्या चिकण विक्रेत्याला होत आहे अशी मागणी आता चिकण विक्रेत्यांकडून होऊ लागली आहे .