प्रतिनिधि , सिंधुदुर्ग : या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय. त्यामुळेच या सरकारने भाजपा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे अशी टीका करताना मुंबईला विभाजीत करण्याच्या कोंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती आहे असा आरोप भाजपा नेते1आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय
पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे आणि या भुमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी अशी आमची इच्छा नाही माञ ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय आणि त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय कोणतही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टी कोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेतलेला हा निर्णय असल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईला विभाजीत करण्याच्या कोंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती
शिवसेने सोबत सत्तेत बसलेल्या कोंग्रेसच्या मंञ्याने मुंबई शहराच्या पालकमंत्र्याने अस्लम शेख यांनी ही मागणी केलीय. मुंबईला विभाजीत करण्याच्या कोंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती आहे असा आमचा आरोप असल्याचा थेट हल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलाय. जर शिवसेनेची भुमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी कोंग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे माञ या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय माञ भारतीय जनता पार्टीला मुंबईचं विभाजन, ञीभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन कोंग्रेस आणि मुखसंमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता स्विकारनार नाही आणि भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
