जनतेज न्युज

बाप से बेटी सवाई : बारावीच्या परीक्षेत बाप-लेक फर्स्टक्लास पास

प्रतिनिधी, सोलापूर : राज्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.त्यात करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील वडील व मुलगी एकाचवेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे गुण संपादन करण्यात मुलीने वडिलांवर मात केली आहे.याचा तिच्या वडिलांना अभिमान वाटत आहे.या परिक्षेत वडीलांना ७० टक्के तर मुलीला ८६.५० टक्के गुण मिळाले आहेत. स्वतः वडील हे सरपंच पदी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनीही फर्स्ट क्लास मिळवत यश मिळविले आहे.कविटगाव येथील सरपंच सौ. विद्या सरडे यांचे पती पैलवान शिवाजी सरडे यांनी मच्छिंद्र नुस्ते कविटगाव येथील मच्छिंद्र विद्यालयातून १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा दिली कारण यापुर्वी अडचणीमुळे याच शाळेतून त्यांना १९९७ साली बारावीच्या परीक्षेपुर्वीच शाळा सोडावी लागली होती. पण त्याही नंतर त्यांच्या मनांत शिक्षणाची आस होती. म्हणून कोरोना काळात अभ्यास करून परीक्षा दिली.पर्यायाने त्यांना या परिक्षेत ७० टक्के गुण मिळवून पास झाले आहेत. योगायोग म्हणजे त्यांची कन्या कु.साक्षी शिवाजी सरडे ही शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदा नगर,बारामती) येथे विज्ञान शाखेत बारावीलाच होती.तीला ८६.५० टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे.कु.साक्षी ही अभ्यासातच हुशार आहे असे नाही तर ती योगा व रोप मल्लखांब ची राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे वडील व मुलगी दोघेही प्रथम श्रेणीत बारावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होतं आहे, तर स्वतः वडील पैलवान शिवाजी सरडे यांना आपल्या मुलीने आपल्यापेक्षा जास्त गुण मिळवल्याचा अभिमान वाटत आहे.