प्रतिनिधी, बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर संधी हुकल्या नंतर पंकजा मुंडे समर्थक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता समोर आली.आधी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदा पासून डावलं आणि आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्याचे सांगत ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. त्यामुळे बीड मधली भाजप आक्रमक होताना दिसत आहे. पंकजा मुंडे समोर ज्यांनी संकट उभे केले अशी लोक कुटुंब प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळावे, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी बीडच्या कनकालेश्वर मंदिरात नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत साकडं घातले. यावेळी हर हर महादेव पंकजा मुंडे तुम आगे बढो अशा घोषणांनी कंकालेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी मीडिया ट्रायल केला होता. त्यानंतर त्यांनी मात्र केंद्राकडे बोट दाखवलं, त्यामुळे पंकजा ताईंना उमेदवारी का मिळाली नाही. याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनीच द्यावं, अशी नाराजी बीड भाजप अधिका-यातून दिसून आले. दरम्यान दोन दिवसानंतर पंकजा मुंडे हे माध्यमांसमोर बोलणार आहेत. त्या आधीच पंकजा समर्थकांनी कंकालेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक घालत साकडे घातल आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
