जनतेज न्युज

बारामती तालुक्यात गाव कामगार तलाठी आणि तहसीलदार यांच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा धुमाकूळ, रात्रण दिवस वाळू उत्खनन राजरोसपणे सुरू..

बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे शासनाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात..
प्रतिनिधी , बारामती : बारामती तालुक्यातील अनेक गावांत कऱ्हा आणि नीरा नदीमध्ये वाळू माफियांकडून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरु आहे.. वाळू उत्खनन गांव कामगार तलाठी आणि तहसीलदार यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मान्सून झाल्यामुळे सर्वच नद्यांना महापूर आले होते या महापुरा मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून आल्याचे दिसून येत आहे अशीच वाळू बारामती तालुक्यातील कऱ्हा आणि नीरा या नद्यांमध्ये आल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाळू माफियांकडून दिवस-रात्र राजरोसपणे कऱ्हा आणि नीरा नदीमध्ये चोरून वाळू उत्खनन करण्याचे काम सुरू आहे मात्र तरीही तहसीलदार आणि गांव कामगार तलाठी यांच्याकडून वाळू माफियांवर कुठलीच कारवाई होताना दिसत नसल्याने महसूल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा वर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आता शासनाने वाळूचे लिलाव सुरू करावेत जेणेकरुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार नाही..