जनतेज न्युज

महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एक कोटी आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळत नाही – माजी मंत्री दशरथ भांडे

प्रतिनिधी , अनुसूचित जमातीच्या आरक्षणा संदर्भामध्ये आज घडीला एक कोटी तीस लाख आदिवासी आहेत. त्यापैकी एक कोटी लोकांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आरक्षणाचे फायदे त्याच्या पर्यंत पोचत नाही. शासनाने नव्याने आढलेला जी आर नेहमाला धरून नाही. तीस लाख आदिवासीना सोई सुविधा मिळतात. एक कोटी आदिवासीना चुकीचा जी आर काढून महाराष्ट्र शासन फायदे मिळू देत नसल्याने ता. ९ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व आदिवासींना एकत्र येऊन शासनाची झोप उडवण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत असे पत्रकात परिषदेत बोलत होते.