जनतेज न्युज

बीड जिल्हा लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळ पुन्हा तोट्यात..

प्रतिनिधी , बीड : बीड मधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये दहा दिवसांची संचारबंदी लावण्यात आलेली आहे मात्र संचारबंदी च्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा विरोध म्हणून सर्व दुकाने बंद ठेवल्या आहेत मात्र गेवराई शहरामध्ये रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसून येत आहे
एक वर्षांपूर्वी बीडसह संपूर्ण राज्यामध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह एसटी महामंडळाला ही आर्थीक फटका बसला होता. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात आता पुन्हा संचारबंदी लावल्यामुळे गेवराई आगाराच्या १२६ एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे गतवर्षी प्रमाणे आताही गेवराई आगाराचे दरदिवशी सरासरी पाच लाखांचे आर्थीक नुकसान होत असल्याचे आगार व्यवस्थापक वाघदरिकर यांनी सांगितले आहे असे असताना लादलेल्या संचारबंदी चा फटका सर्वसामान्यांना तर सहन करावाच लागतो परंतु तो एसटी महामंडळाला ही अधिक बसत आहे त्यामुळे लोकांनी कोरोना विषयीच्या गाइडलाइन्स चे पालन करुन प्रशासनाला लाॅकडाऊन न लावण्यास मदत करावी