जनतेज न्युज

व्यापाऱ्याने वेळेत खरबुज न उचलल्याने शेतातच सडले , शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी , उस्मानाबाद : निसर्गाच्या लहरीपणातही काहितरी वेगळे करण्याच्या उदेशाने दोन एक्कर खरबुज तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासले आणि उत्पन्नही चांगले होईल असे दिसु लागले . खरबुज तोडणीला येण्यापुर्वी व्यापाऱ्याने स्वतः शेतात येऊन खरबुजाचा भाव ठरवत संपुर्ण माल उचलण्याचे कबुल केले . तोडणीला आल्यानंतर केवळ ५ टन माल सुरवातीला तोडला व नंतर १० ते १५ दिवसानंतर पाठीमागे लागल्याने १५ टन माल तोडला . व्यापाऱ्यान वेळेत माल न तोडल्यामुळे व संपुर्ण माल न उचलल्यामुळे जवळपास १५ टन खरबुज जाग्यावरच नासले असुन व्यापाऱ्याने दगा दिल्याने शेतकऱ्याला दीड ते दोन लाखाचा फटका बसला आहे . व्यापाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असुन उमेदीने प्रयोगशिल शेती करणाऱ्यांचीही निराशा होत आहे . अशा व्यापाऱ्यांना अदल घडवण्यासाठी अडत्यांवर बाजार समितीचे जसे नियंत्रन असते तसेच अशा मोकाट व्यापाऱ्यांवरही शासनाने निर्बंध लादावेत अशी मागणी होत आहे .