प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा तहसील कार्यालयातील 3 कर्मचारी कोरोना पोजिटिव्ह आले असून 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लक्षने दिसून येत आहे. त्यांची कोरोना तपासणी रिपोर्ट आज प्राप्त होणार आहे.या कार्यलयात तालुका भरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात परिणामी कार्यालयात सॅनेटायझेशनची तयारी सुरु असून कार्यालयातील कर्मचारी,तलाठी, मंडळ अधिकारी अशा जवळपास 70 जणांची आरटीपीसीआर कोवीड टेस्ट आज तहसिल कार्यालताच घेण्यात येणार असून त्यामुळे कार्यालय दुपारी 3 वाजे पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी देत जनतेला आवाहन केले आहे की,जे लोक मागील 6-7 दिवसात तहसिल कार्यालयच्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी…
