जनतेज न्युज

आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही…

प्रतिनिधी , कोल्हापूर : आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही… त्या प्रकल्पग्रस्तांनी या धरणाच्या कामाला विरोध केलाय… मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाच्या ठिकाणी बंदूकधारी पोलीस बंदोबस्त लावून काम सुरू करण्यात आलय… प्रशासनाच्या या दडपशाहीवर प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केलाय.. गेल्या वीस वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.. हा प्रश्न मार्गी लावणार धरणाच्या काम सुरू करावं यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा आंदोलन केली आहेत…मात्र आता बंदूकधारी पोलीस बंदोबस्तातच धरणाच्या घरभरणी चे काम सुरू करण्यात आलय.. वेळोवेळी लढा देऊन पाठपुरावा करूनही ुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागत नसताना धरणाचं काम पूर्ण करण्यासाठी सुरु असलेल्या दडपशाहीचा या प्रकल्पग्रस्तांनी निषेध केलाय. ज्या मंत्री मुश्रीफ यांना आपलं म्हटलं त्यांनीच घात केला असल्याची तीव्र भावना डोळ्यात अश्रू आणत या प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केलीय…