जनतेज न्युज

बुलडाण्यात अज्ञातांनी 5 एकर शेतातील संत्र्याचे ९०० झाडे तोडली.

शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार.
प्रतिनिधी , बुलडाना : शासनाने शेतकऱ्याला मदत करावी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांची मागणी.
बुलडण्यातील सोनाळा येथील शेतकरी विजय रमेश वेरुळकर यांच्या ५ एकर शेतातील अज्ञात व्यक्तींनी संत्रीचे ९०० झाडे तोडलीय. ही झाडे या शेतकऱ्याने एक वर्षाअगोदर ५ एकरात लावली होती. ४ ते ५ फुटाचे ९०० झाडे बुडासकट कापुन फेकले आहेत. शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करुनही पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतातील तोडलेल्या झाडाची पाहणी करुन झाडे तोडणाऱ्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी तसेच संबंधित शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. याबाबत प्रशांत डिक्कर (विदर्भ प्रमुख,स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी माहिती दिली.