जनतेज न्युज

बुलढाण्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘एक वही एक पेन’ अभियानाची सुरुवात… चैत्यभूमीवर पाचशे पत्र पाठवून करणार अभिवादन…

आम्ही धम्म बांधवांचा शहरात उपक्रम…
प्रतिनिधी , बुलडाणा :विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही धम्म बांधव या परिवाराकडून एक वही व एक पेन या अभियानाची सुरुवात केली आहे तसेच चैत्यभूमीवर जाऊ न शकणारे बांधव बुलडाण्यातून पाचशे पत्र चैत्यभूमीवर पाठवुन अभिवादन करणार आहे.
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात महापुरुषांना अभिवादन हे वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून करण्यात येत असते. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आम्ही धम्म बांधव परिवाराच्यावतीनेसुद्धा वर्षभरात विविध उपक्रम राबवून मदतीचा हात पुढे केला जात आहे.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक वही, एक पेन हा उपक्रम ६ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील धम्म बंधूंनी सहभागी होऊन जास्तीत जास्त शालेय साहित्य दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे. जमा होणारे वही, पेन हे ग्रामीण भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे..तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबरला लाखो अनुयायी चेत्यभूमीवर जाऊन नतमस्तक होत असतात .मात्र या वर्षी कोरोनामुळे अनेक बंधने आली आहेत. त्यामूळे पाचशे पत्र पाठवून अभिवादन करण्यात येणार आहे…