प्रतिनिधी , बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बुलढाणा येथील महामानव ग्रुपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आज या रक्तदान शिबिरात सकाळी 11 वाजेपर्यंत 50 बॉटल रक्तदान करण्यात आले होते.समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक नागरिक सहभागी झाले होते..
