जनतेज न्युज

बोकटे-ओगदी रस्त्याचे निकृष्ट कामसंदर्भात आमरण उपोषण…..येवला पंचायत समितीसमोर सुरू उपोषण…

प्रतिनिधी, येवला : येवला तालुक्यातील बोकटे येथील बोकटे-ओगदी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असुन, या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने रस्त्याच्या कामात सुधारणा करावी या मागणी करिता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईटस् मिशन याच्या वतीने येवला पंचायत समिती कार्यलयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील दखल न घेतल्याने आमरण उपोषण सुरू केले असून रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.