जनतेज न्युज

धरणग्रस्त 42 गावातील नागरिक अद्यापही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच, पुनर्वसन न झाल्यास दिला आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी, हिंगोली : सेनगांव तालुक्यातील धरणग्रस्त 42 गावातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न शासन दरबारी मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना हालाखीचे जीवन जगावे लागत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत येलदरी धरणात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.सेनगांव तालुक्यातील खडकी,बोरखेडी,भंडारीसह 42 गावे व तेथील नागरिकांच्या जमिनी येलदरी धरणात गेल्याने त्यावेळी त्यांना अत्यंत तोकडी मदत घेऊन पुनर्वसन करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते शासनाची पोकळ आश्वासने व उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने त्यांच्यावर वाईट वेळ आली असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जर शासनाने तात्काळ पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास 42 गावातील नागरिकांना घेऊन येलदरी धरणात आत्मदहन करण्याचा इशारा पूर्णा धरण संघर्ष समितीच्या वतीने सरपंच एकनाथ हराळ व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.