जनतेज न्युज

ब्लॅकमेलिंग करून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना अटक

प्रतिनिधी, बुलढाणा : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील जामठी येथील माजी सरपंच असलेल्या वामनराव पाटील यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हा सांगितलेल्या पत्त्यावर गजानन पाटील पोचले असता त्या ठिकाणी महिलेसोबत चार जण दडून बसले होत . यावेळी सर्व तयारी केल्यानंतर अचानक दडून बसलेल्या चार जणांनी तुमचा व्हिडिओ पूर्ण काढला आहे. तुम्ही आम्हाला एक लाख रुपये द्या अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली व त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशामध्ये असलेले साडेचार हजार रुपये त्यांनी काढून घेतले त्यावेळी त्यांनी कसाबसा तिथून पळ काढला.. या संदर्भात त्यांनी आज बुलढाणा पोलीस तक्रार दाखल केली. बुलढाणा डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुना रोड भागातील एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेऊन त्यांचे वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.