पेट्रोलचे शतक गाठल्यामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना दिली ट्रॉफी
प्रतिनिधी , थंडीमुळे पेट्रेल आणि डिझेलचे दर वाढल्याचा जावईशोध केंद्रीय पेट्रिलियम मंत्र्यांनी लावला , या विरोधात सोमवारी युवासेनेने पेट्रोलपम्पावर आगळे आंदोलन केले . भर उन्हात कानटोपी , स्वेटर , हातमोझे परिधान करून आपल्या वाहनात पेट्रोल भरत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक आंदोलन केले . पेट्रोलचे दर शंभरी पर्यंत पोहोचले असल्याने देशाच्या पंतप्रधानांना एक आकर्षक ट्रॉफी पेट्रोल पम्प मालकाच्या माध्यमातून भेट देण्यात आली.
देशात सर्वत्र पेट्रोल , डिझेल , घरगुती गॅस च्या दरात प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होत आहे या विरोधात देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र थंडीमुळे हे दर वाढ असल्याची बाष्कळ बडबड करून देशाची दिशाभूल करत आहेत याच्या निषेधार्थ ठाण्याच्या युवासेनेने शहरातील मध्यवर्थी असलेल्या पेट्रोल पंपावर जावून अनोखे आंदोलन केले , यावेळी राहुल लोंढे यांच्यासह युवासेना उपविभाग अधिकारी विक्रांत वायचळ , शुभम वायचळ , हर्षद जाधव , अमित वायचळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले .
