प्रतिनिधी , सांगली : सांगली महापालिका मुख्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील यांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांच्या हस्ते स्टेशन चौकातील स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास आणि त्यानंतर महापालिका मुख्यालयातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त पराग कोडगुले, वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे , शैलेश खोत, अरुण माळी, प्रसाद जामसंडेकर यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.
