जनतेज न्युज

मास्टर माईंड हे जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे : निहाल पांडे

प्रतिनिधी , आर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकारक औषधी चे निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद वर्धा च्या वतीने करण्यात आला असता यामध्ये एकूण दहा फर्म ने आपला अर्ज दाखल केला होता मात्र यापैकी तीन फर्म कडे अधिकृत दस्तावेज नसतानासुद्धा ही गैरव्यवहार करून त्यांनी निविदा प्राप्त करून घेतले.
यामध्ये यांना निविदा प्राप्त करून देण्यामध्ये स्वतः मास्टर माईंड हेच जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे आहेत असा आरोप युवा परीवर्तन की आवाज संघटनेचे मुख्य निहाल पांडे यांनी केली.
येत्या दोन तीन दिवसात आम्ही जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन बसू आणि आंदोलन करू असे देखील बोले.