प्रतिनिधी , पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याच्या गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता संजय काकडे आणि उषा काकडे या दोघांनाही अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यामुळेेे काकडे दांपत्य नेमके कुठे काय झाले याचा तपाास पोलिस करत आहेत.
युवराज ढमाले (वय 40) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्या मध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात..
ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेली असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिली होती..
