प्रतिनिधी, जालना : मंकीपॉक्सचा राज्यातच काय पण देशात एकही रुग्ण नाही असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी WHO च्या सूचनेनुसार काम केलं जातं असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत देखील टोपे यांनी भाष्य करत काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून शरद पवार यांच्या सूचनेनुसार वाटचाल केली जाईल असंही ते म्हणाले.नारायण राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या ट्वीट बाबत प्रतिक्रिया देत राणे यांची टीका राज्याच्या सुसंकृतपणाला शोभणारी नसल्याचं देखील टोपे म्हणाले.
