जनतेज न्युज

मतभेत दूर करून नेते महाआघाडीचे अभिजित पाटील यांना विजयी करतील .उदेसिंग पाडवी ..

प्रतिनिधी , नंदुरबार: 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या धुळे नंदुरबार विधानपरिषद च्या निवडणुकीमध्ये महाआघाडी चे उमेदवार अभिजीत पाटील विजयी होतील अशा विश्वास आम्हाला आहे , असे मत माजी आमदार व आताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले उदेसिंग पाडवी यांनी केला आहे .
या पूर्वी अमरीश भाई पटेल हे या क्षेत्रांचे आमदार होते त्याचा बद्दल मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे .अमरीश भाई पटेल यांनी कोणत्याच तालुक्याला न्याय दिला नाही ,तालुक्यांना निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे धुळे,नंदुरबार तळोदा अश्या तालुक्यांचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही .आता नवीन उमेदवाराला संधी मिळावी पाहिजे असे जनमानसात ,मतदारांमध्ये बोलले जात आहे ,त्याच सोबत महाआघाडी च्या नेत्या मध्ये कुठलाच मतभेत नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व नेते एकत्रित काम करून निवडणुकी मध्ये आघाडीच्या उमेदवारा ला मदत करतील त्यामुळे महाआघाडीचा उमेदवार विजयी होईल असा ठाम विश्वास माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी व्यक्त केली आहे .