जनतेज न्युज

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप.

प्रतिनिधी , जालना: १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा.कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा. मुदतपूर्व सेवा निवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा या आणि ईतर १२ मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जालन्यात संप करण्यात आला.या संपा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून संपात सहभाग नोंदवला.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरु आहे.या संपाला जालन्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन प्रतिसाद दिला.कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच फजिती झालेली पाहायला मिळाली.दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढेही आंदोलनं सुरूच राहतील असा ईशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय.