जनतेज न्युज

वीजबिल माफीच्या मागणीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा.

प्रतिनिधी , जालना: जिल्ह्यातील शेतकरी,घरघुती वीज ग्राहक यांचे वीजबिल माफ करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला.या मोर्चात शेकडो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोर्चा दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.महिला बचत गटांनी घेतलेलं कर्ज माफ करावं अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांनी केली.अनेकवेळा निवेदन देऊनही महावितरण कंपनी कोरोना काळातील वीजबिल माफीला तयार नाही.जोपर्यंत हे वीजबिल माफ केलं जाणार नाही तोपर्यंत आणखी आक्रमकतेनं आंदोलनं सुरूच ठेऊ असा ईशारा मनसेकडून देण्यात आलाय.