जनतेज न्युज

मनसेच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमाचा राज ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी ,मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. अरे बघताय काय सामिल व्हा, असं म्हणत मनसेने तमाम मराठीजनांना साद घातली आहे.

पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोबिंवली तसंच मिरा भाईंदर महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. याच महानगरपालिकासांठी खुद्द राज ठाकरे यांनी पुढे सरसावत गेल्या अनेक दिवसांपासून विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आहे.