जनतेज न्युज

मराठवाडा जनता विकास परिषद व रेल्वे संघर्ष समिती यांची आज बैठक संपन्न

प्रतिनिधि , मराठवाड़ा : विकासासाठी मराठवाड्यातील सर्व खासदारांनी एकत्र यावे असं आवाहन माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी केलं आहे. रविवारी मराठवाडा जनता विकास परिषदेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. नांदेड-बिदर रेल्वे लवकरात लवकर पूर्ण कारवाया अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांबाबद विविध ठराव घेण्यात आले. खासदार चिखलिकारांनी देखील या बैठकीला हजेरी लावली होती.