प्रतिनिधी, औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रामदास आठवले औरंगाबाद आले असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असून खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे हे मुंबई ते मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण करणार असून त्यांच्या या लढ्याला रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया आज रोजी रामदास आठवले यांनी दिली आहे.मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी अपेक्षा रिपब्लिकन पक्षाची नेहमीच असून त्यांच्या या लढ्यात रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असून मराठा आरक्षणाला जाहीरपणे पाठिंबा जाहीर करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज रोजी दिली आहे.
