जनतेज न्युज

मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडत आहे…

मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडत आहे… मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.. जलसंपदा मंत्री जयंत पाटील

प्रतिनिधी , सांगली : मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडत आहे… सरकार कुठेही बाजू मांडण्यात कमी पडत नाही… आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या वकिलां बरोबर आघाडी सरकारने अन्य दोन वकील उभे केले आहेत….न्यायालय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत योग्य न्याय देईल अशी आशा आहे..असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते…
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांच्या पुनर्वसनासाठी 13 जानेवारी पर्यंत धडक मोहीम राबवणार आहे.. पुनर्वसनग्रस्त आणि व्याघ्र प्रकल्पग्रस्त यांचे जमीन किंवा इतर मूलभूत प्रश्न यामध्ये सोडवून पुनर्वसन बरोबर इतर प्रश्न मार्गी लावण्यात येणार.. असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले…