जनतेज न्युज

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची बुलडाण्यात ट्रॅक्टर रॅली..

प्रतिनिधी , बुलडाणा : कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.. या काळ्या कायद्यांविरोधात बुलडाण्यात ही काँग्रेस पक्षाने संघर्ष सुरू केलाय.. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्यट्रॅक्टररॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाण्यातील संगम चौकातून ही रॅली सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात येत आहे. जवळपास 100 ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. माजी आमदार हर्षवधन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आलीय. जिल्ह्याधक्ष राहुल बोंद्र,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती…