प्रतिनिधी , मुंबई : मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे १५० शिक्षकांना मुंबई महानगरपालिकेतून शिक्षण विभागाने नोकरी देण्यास नकार दिला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तसेच डीएड.,बीएड. केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सवलत देण्यात आली होती.
त्यामध्ये पात्र झालेल्या १५० शिक्षकांना फक्त मराठीमध्ये दहावीचे शिक्षण घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. या करिता मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात हे सर्व शिक्षक आंदोलनासाठी आजाद मैदान येथे बसलेले आहेत.
