जनतेज न्युज

शेतकऱ्यांचे विज बिल संदर्भात नामदार जयंत पाटील यांना चोपड्यातील शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी , जळगाव : महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे विजेचा वापर 180 दिवस देखील नाही काही दिवस पाणी द्यावा लागत नाही काही दिवस पाऊस असतो काही दिवस पडीत ठेवावे लागतं ऊन खाण्यासाठी अशा परिस्थितीत मध्ये 365 दिवसाचे विज बिल सरकार देतं त्यात जर 50 टक्के सवलत देणार असेल त्याला सवलत म्हणता येत नाही माझी विनंती आहे की जे आम्ही वापरलेलं आहे त्याच्यात वीस-पंचवीस टक्के जर असतील तर ती गोष्ट वेगळी आहे शेतकऱ्यांना कोरोना च्या काळात शेतकऱ्यांना एकी सवलत मिळाली नाही आमच्या म्हणनं आहे की शेतकऱ्यांच्या मागचे बिल माफ करावं आणि जस आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं अश्वशक्ती वर आधारित ती स्कीम गुजरात मध्ये आहे राजस्थान मध्ये आहे त्यानुसार ते व्हावं अशी प्रतिक्रिया शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील यांनी दिली.