प्रतिनिधी, कल्याण : दुकाने आस्थापनाना प्रमुख नामफलक मराठीत लावण्याबाबतच्य सूचना पालिकेने दुकानदार आणि आस्थपणाना दिला होता .मात्र अद्याप बहुतांश दुकानांचे प्रमुख नामफलक इंग्रजी मध्ये दिसून येत आहेत . या पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकारी आज पालिका आयुक्तांची भेट घेत पालिकेला निवेदन सादर केले .येत्या १२ तारखेपर्यंत दुकानावरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत अन्यथा बारा तारखेनंतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे. शासनाच्या निर्देशाुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा अशा सूचना देत अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असा इशारा शहरातील दुकानाराना दिला होता .मात्र अद्यापही कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानदारांचे प्रमुख नामफलक इंग्लिशमध्ये दिसून येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी अद्याप कारवाई सुरू करण्यात आलेले नाही .याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे .मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर , जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आदी पदाधिकार्यानी पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केलं .मराठी पाट्याबाबत पालिकेला १२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. तरी याबाबत पालिका आयुक्तांनी दुकानदारांना सूचना दिले असून लवकरात लवकर अमल बजावणी करण्याचे आव्हान केले आहे.
