भारत सरकारकडे 7 वर्षापासून प्रलंबित मागणी…छगन भुजबळ
प्रतिनिधी, नाशिक : 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता अनेक कलाकार तसेच राज्य सरकारने पाठपुरावा करून देखील अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नसून केंद्र सरकार या मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार का असा प्रश्न येवला दौऱ्यावर आलेले छगन भुजबळांना विचारला असता….? ….भुजबळ म्हणाले की.. गेल्या सात वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून मिळाला नसून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
