पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी ‘दो बूंद जिंदगी के’ आवश्यक
प्रतिनिधी, वर्धा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता जिल्हयात १३४० लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली असुन यामध्ये ग्रामीण भागात ११३४ शहरी क्षेत्रात २०६ केंद्रे आहेत . या मोहीमेत एकुण ३२५१ कर्मचारी व २७० पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत . यावर्षी ग्रामीण भागातील ७७
९ २८ लाभार्थींना व शहरी भागातील ३०,१३१ असे एकुण १,०८,०५ ९ लाभार्थींना पोलीओचा डोज पाजण्यात येणार आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी सांगितले.
जिल्ह्यात जागोजागी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यात या लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात आज झाली असून जिल्हासामान्य रुगणालयात आज मृणाल माटे आरोग्य सभापती यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन बाळाला पोलिओ देऊन केले तसेच आपल्या बालकांना आज पोलिओचा डोस द्यायला विसरु नका असे आवाहन ही त्यांनी केले.
