प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार 29 जून रोजी औरंगाबाद शहरातील आरटीओ कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले असून यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनिष जोगदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी परिवहन कार्यालयासमोर मोठ्या घोषणा ही देण्यात आले असून यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने औरंगाबाद सेवा शहरातील रिक्षाच्या मीटरमध्ये दरवाढ करण्यात येण्यात यावी रिक्षांना नवीन मीटर लावण्यात यावे रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे आकारण्यात यावे अशी विविध मागण्या सदरील संघटनेच्या वतीने आज रोजी करण्यात आले असून या विविध मागण्याचे निवेदन परिवहन अधिकारी यांना सदरील निवेदन देण्यात आले आहे मागण्या मान्य झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे मनिष जोगदंडे राहुल पाटील संकेत शेटे प्रशांत दहिवडकर यांच्यासह वाहतूक सेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती सदरील आंदोलन आज रोजी परिवहन कार्यालयासमोर सदरील आंदोलन संपन्न झाले आहे.
