जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व मंत्री मंडळाने जो निर्णय घेतला त्यांचा मी खूप आभारी आहे; माजी खासदार चंद्रकांत खैरे*

प्रतिनिधी, औरंगाबाद : या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहासिक निर्णय घेतला*आज बुधवार 29 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने कॅबिनेटच्या मंत्रीमंडळात मान्यता मिळाली असून याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि येणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे,
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगरचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून अनेक वर्षापासून या निर्णयाची वाट शिवसैनिकांनी औरंगाबादचे नागरिक पाहत होते मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदरील ठराव घेऊन संभाजीनगर नावाला मान्यता मिळाली आहे,
अशी माहिती त्यांनी माध्यमांची बोलताना दिली आहे.