जनतेज न्युज

महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले – शरद पवार,अघ्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी , पुणे : महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले. त्याचे यश असून पुणे मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं आहे . हा महाराष्ट्रातील निकाल महाविकासआघाडीचा विजय आहे. अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान मागील निवडणुकीत मला कमी फरकाने पराभव स्विकारावा लागला पण यावेळेस महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने ही निवडणुक गंभीर घेतली आणि सर्वच कार्यकर्तै आमदार, पदाधिकारी यांनी जोमाने प्रचार करत मला निवडुन आणले त्याबद्दल त्याचे आभार मानतो अस मत पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.