प्रतिनिधी, मुंबई : सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या पुन्हा सुरू झालेले आहेत, काल तरुण काश्मिरी पंडितांची हत्या त्याच्याच कार्यालयात करण्यात आली, काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू झाला आहे, हे प्रधान मंत्री आणि गृहमंत्री यांनी अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवले पाहिजे, कश्मीरी पंडितांची घरवापसी आणि त्यांची सुरक्षा हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता, त्यासाठी 370 कलम हटवण्यात आले, कश्मीर चे विभाजन करण्यात आले, त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला, तरीही कश्मिरी पंडित यांची घरवापसी होऊ शकली नाही, काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत, फक्त कश्मीरी पंडित नाही तर तिथल्या सामान्य लोकांचे जीवन देखील असुरक्षित आहे, असे वारंवार सांगितले जात आहे, लाऊड स्पीकर, हनुमान चालीसा असे मुद्दे घेऊन कश्मीर सारख्या विषयावरून लोकांचे मन तुम्ही विचलित करू शकत नाही, लोकांचे अत्यंत बारीक लक्ष या विषयाकडे आहे, शिवसेना कश्मीरी पंडित यांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे, एका बाजूला चीन घुसले आहे तर दुसर्या बाजूला कश्मीर अशांत आहे हे देशाला परवडणारे नाही.हे रितीरिवाज नाहीत, वारंवार संभाजीनगर येथे यायचे आणि औरंगजेब च्य कबरिपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टिकायचे, अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे, पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाचा कबरी पुढे तुम्ही आज नमाज पडत आहात, त्या औरंगजेबाला कबरी मध्ये मराठ्यांनी टाकले आहे, कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरी मध्ये जावे लागेल.शरद पवार यांच्या बद्दल बोलण्यासाठी त्यांच्या पक्षातले अनेक नेते समर्थ आहेत, पण महा विकास आघाडी मधील नेत्यांनी तोलून-मापून बोलले पाहिजे, महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असे कोणी बोलू नये.
