जनतेज न्युज

महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे करण्यात आला पुतळा दहन.

प्रतिनिधी , धुळे : गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरणावर नवनवीन खुलासे होत असताना या सर्व प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा राज्य सरकारच्या भ्रष्ट पणामुळे मलीन झाली असल्याचा आरोप करीत भाजपतर्फे आज धुळे शहरामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ पुतळा दहन करण्यात आला.
राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे प्रकरण असेल तसेच मंत्री राठोड प्रकरण त्यानंतर आता वाझे प्रकरण यामुळे ठाकरे सरकार हे फक्त भ्रष्ट व लंपट मंत्र्यांना पाठीशी घालण्यातच काम करीत असून, दुसरीकडे राज्य सरकारच्या भ्रष्ट कारस्थानामुळे मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप भाजप तर्फे करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने नैतिक जबाबदारी सांभाळत राजीनामा देण्याची मागणी देखील या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केली आहे.
यावेळी निषेध करत महा विकास आघाडीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. व या कार्यकर्त्यांतर्फे राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.