जनतेज न्युज

मावेजा मिळत नसल्याने  शेतकऱ्याने केला पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न..

प्रतिनिधी , बीड : जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांने शासकीय कार्यालयात पेट्रोल ओतून पेटवून घेतले.कार्यकारी अभियंता बीड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात , दुपारी 1 वाजता ही धक्कादायक घटना घडलीय.गेल्या 50 ते 60 वर्षांपासून , जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.अर्जुन कुंडलिक साळुंखे अस आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव असून यात तो 50 ते 60 टक्के भाजला आहे.
जवळपास 60 वर्षापूर्वी बीड तालुक्यातील पालीच्या बिंदुसरा प्रकल्पात, साळुंके यांची जमीन गेली होती.मात्र अद्याप मावेजाच मिळाला नसल्याने , साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या लाल फितीतील भोंगळ कारभाराला कंटाळून उचलले आहे.तर मावेज्याची मागणी घेऊन , साळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय , हायकोर्ट , मंत्रालय आदी ठिकाणी आपला लढा लढला होता.मात्र निगरगट्ट प्रशासनाच्या कारभारामुळे हे पाऊल आज उचलले आहे.