जनतेज न्युज

मुकुल बालक मंदिर मध्ये आषाढी एकादशी निमित्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी काढली दिडीं

प्रतिनिधी, औरंगाबाद : मुकुंद विद्या मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडी काढली या दिंडीसाठी शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी परिश्रम घेतले.तसेच यावेळी सर्व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी दिडीं मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले यावेळी दिंडीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेतील विध्यार्थी, व विध्यार्थ्यांनी यांनी जय हरी विठ्ठल टाळ वीणा वाजवत मिरवणूक काढली.गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे शाळा बंद होती त्यामुळे शाळेमध्ये कोणताही उत्सव साजरा करता आला नाही परंतु यावर्षी वारीचे सुंदर असे रंगीत कार्यक्रम यावेळी घेण्यात आला त्यामुळे मुलेही आनंदी होते यावेळी शाळेमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेषामध्ये रामदास ,तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई अशा वेषामध्ये विद्यार्थ्यांना वेशभूषा करून इतर विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती दिली पंढरीच्या वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा याकरिता विद्यार्थ्यांना वारी व वारीचे महत्व पटवून देण्यात आले पालखीमध्ये विठ्ठलाची विठ्ठल रुक्माई ची मूर्ती ठेवून आरती करून पालखी काढण्यात आली पालखी काढण्या अगोदर विद्यार्थ्यांनी अभंग हरिपाठ हे सुद्धा गायले पालखी निघाली त्यावेळेस शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला यावेळेस शाळेतील शिक्षिकांनीही फुगड्यांचा मनसोक्त आनंद घेतला शाळेचे मुख्याध्यापक परदेशी हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या पालखीमध्ये सहभागी झाले व त्यांनीही टाळच्या ठेक्यावर ठेका धरत पालखीमध्ये सहभाग नोंदवला यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकच चैतन्य निर्माण झाले मुख्याध्यापक म्हणाले की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सण उत्सवाची माहिती व्हावी व आषाढी एकादशी ही वारकऱ्यांची वारी आहे त्यामुळे या वारीमध्ये तुळशीला महत्त्व आहे व महिला तुळस डोक्यावर घेऊन जात असतात त्यामुळे कुठेतरी मुलांना आपल्या संस्कृतीची जाण व्हावी यामुळे आषाढी एकादशी हा कार्यक्रम शाळेत शिक्षकांनी आयोजित केला होता असे म्हणाले.