प्रतिनिधी , भुसावळ – जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर तहसीलदार स्वेता संचेती यांनी कारवाई करत जमा केले आहेत विशेष म्हणजे ही कारवाई पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास तरी तहसीलदारांनी आपल्या कारवाईचा धडाका दाखवला आहे
तालुक्यातील पुरनाड फाटा रस्त्यावर तहसीलदारांनी पथकातील कर्मचाऱ्यांसह छापे टाकून ही कारवाई केली असून ट्रॅक्टर मालकांना तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संचेती यांनी सांगितले आहे
