प्रतिनिधी, सातारा : पुण्यातील खेड तालुक्यातील ब्रिहम येथे शेळया चारत असताना युवकास शेतात १५ व्या शतकातील नाणी सापडली . ही घटना दि ४ जानेवारी २०२२ ला घडली होती . ती नाणी खेड तहसीलदारांनी ताब्यात घेवून दि . १ ९ रोजी साताऱ्यातील छ . शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आल्याची माहिती संग्रहालयाचे प्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिली . सदरची नानी शिवकालीन असल्याने यांना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच सदरची शिवकालीन नाणी आता सातारच्या शिवाजी संग्रहालय मध्ये नागरिकांना पाहता येणार आहे
या नाण्यांनमध्ये शिवराई नाणी , अकबर नाणी , बहामणी , सुलतान नाणी , निजाम शाही नाणी ईस्ट इंडिया कंपनीची नाणी याचा समावेश असून त्याचे वजन साधारण २.४० किलो ग्रॅम आहे . पुण्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वहाणे यांच्याकडून ती १४७ तांब्याची नाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रमुख प्रविण शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली . ब्रिहम येथे दि . ४ जानेवारी २०२२ रोजी सुयश रोकडे हा मुलगा रोहीदास सावंत यांचे शेतात शेळ्या चारण्यास गेला होता . तेव्हा त्याला शेतात १५ व्या शतकातील १४७ नाणी सापडली होती सध्या ही नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली आहेत
