जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
प्रतिनिधी, वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवला..
दुचाकी आणि गॅस सिलेंडरलाही आंदोलनात सहभागी करून..आता या दुचाकीत पेट्रोल भरावं की गॅस सिलिंडर विकत घेऊन अन्न शिजवून भुक भागवावी,असा गंभीर प्रश्न केंद्रशासनाच्या पुढे मांडला..केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची पर्वा न करता दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सतत करते आहे..त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून जगावं कसं हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यामुळे, लवकरात लवकर ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे..
