जनतेज न्युज

“मेगा जॉब फेअर” भव्य रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी, औरंगाबाद : वसंतराव नाईक कॉलेज येथे आज विविध शैक्षणिक अहर्ता प्राप्त सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीसाठी वसंतराव नाईक महाविद्यालय व खासदार इम्तियाज जलील संचलित दुआ फाउंडेशन अंतर्गत जॉब ॲलर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने “मेगा जॉब फेअर” चे भव्य रोजगार मेळाव्याचे दिनांक 9 जुलै 2022 शनिवार रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत वसंतराव नाईक महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते या मेळावाला खासदार इम्तियाज जलील माजी खासदार उत्तमसिंग पवार उद्योजक राम भोगले इतर कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित होते या ठिकाणी चार ते पाच हजार नोकऱ्या या ठिकाणी मिळतील या ठिकाणी किती बेरोजगार या ठिकाणी आलेले आहे भरपूर जणांच्या नोकरी गेलेले आहे कोरोना काळामध्ये नोकरी गेलेली आहे त्यामुळे या जॉब अलर्ट चा युवकांना फायदा होईल. बीड नांदेड उस्मानाबादहून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे तेथील खासदारांनी विद्यार्थ्यांसाठी तेथे उद्योग निर्माण करावा तेथे कंपन्या बोलवावे जेणेकरून ते विद्यार्थी तिथे त्यांना रोजगार मिळेल असे इम्तियाज जलील म्हणाले.