जनतेज न्युज

मोटारसायकल चोरी करणारी टोळी भडगाव पोलिसांनी केली जेरबंद…

प्रतिनिधी , जळगाव : भडगाव येथील मोटर सायकल चोरी करणारी टोळी धुलिया तिथे विकण्यासाठी घेऊन जात असताना फागना तालुका धुळे येथील आरोपी यांना पोलिसांनी रंगेहात मुद्देमालासह पकडले तसेच आरोपीचे नाव अजय दिगंबर जाधव रा. खालची पेठ भडगाव, दुसरा आरोपी गणेश आनंदा माळी रा .जकातदार गल्ली भडगाव या चोरट्यांनी मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना फार्मा जवळ पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. चोरट्यांनी चोरी गेलेले मोटर सायकल तब्बल सहा मोटरसायकल भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या मोटारसायकलीचे आरोपींनी नंबर प्लेट काढून विकण्यासाठी घेऊन गेले होते तसेच फक्त मोटर सायकल यांच्या नंबर इंजन नंबर ये दिसत आहे वडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 306/ 20 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व उपनिरीक्षक सुनील सोनवणे तपास अमलदार किरण ब्राह्मणे पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाबळे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील प्रल्हाद शिंदे नितीन रावते सोपनिल चव्हाण ईश्वर पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकामी सहकाये केले आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करत आहे