जनतेज न्युज

यापुढे भाजपा कार्यालयावर हल्ला झाल्यास इट का जवाब पत्थर से देंगे बावनकुळे यांचा इशारा……

प्रतिनिधी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते,आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच तोफ डागली. डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडी च्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला…
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला व जाळण्याचा प्रयत्न केला,यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशाराही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला…
या महा विकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात एक हजार कोटीचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्या समक्ष झाला आहे या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केली अशी माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा बावनकुळे यांनी केली..